Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

श्री शिवशंभू ट्रस्टच्या शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर सप्ताह मासला रक्तदात्यांची खंबीर साथ: 8 दिवसात विक्रमी 2200 रक्ताच्या बॉटलचे झाले रक्तसंकलन!

Spread the love

महाराष्ट्र | श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे. मागील 8 दिवसांमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान करून शिवरायांना शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान करून नतमस्तक होण्याच्या संकल्पनेला साथ देत पूर्ण महाराष्ट्रभर दि 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी (सप्ताह मास) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रक्तदात्याला प्रोत्साहन पर म्हणून रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार ट्रस्टचा लोगो असलेला टी शर्ट प्रत्येकाला भेट देण्यात आला. या सप्ताह मासला रक्तदात्यांनि चांगलीच साथ देत रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी व शिवशंभू ट्रस्ट वरती विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

संपूर्ण महाराष्ट्राला शिवशंभू ट्रस्टच्या रक्तदानाबद्दल माहिती आहे लॉकडाऊन च्या काळातही शिवशंभू ट्रस्टने रक्ताच्या तुटवड्यापासून महाराष्ट्राला वाचविले होते, व ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत ट्रस्ट वरती विश्वास ठेऊन रक्तदान केले आहे अश्या लोकांना वेळोवेळी शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून मदत झाली आहे त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊनच लोक जिथे जिथे शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबीर असतील तिथे तिथे रक्तदान करतात हे मात्र आता नक्की झाले आहे असे यावेळी काही रक्तदात्यांची व ज्यांना मोफत बॅग मिळाली आहे अश्या रुग्णांनी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रामधील गावानिहाय रक्तदान शिबिराची आकडेवारी:

14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी:-

1- खाणोटा -75
2- भिगवण -70
3- शिक्रापूर -143
4- नवचारी (माळशिरस)-70
5- टण्णू (इंदापूर)-95
6- उमरगा -65
7- माळशिरस शहर -80
8- वालचंदनगर गार्डन -150
9- बारामती – 80
10- रणसिंगवाडी – 51
11- करमाळा शहर – 77
12-हिसरे (करमाळा ) – 90
13-जाधववाडी (इंदापूर)- 45
14-मोळ (खटाव)- 75
15- जंक्शन – 65
16- लासुर्णे – 85
17 – वालचंदनगर शहर – 120
18-वडगाव उ (करमाळा ) – 60
19 – इसबावी (पंढरपूर ) – 70
20 – जैनवाडी (पंढरपूर ) – 90
21 – कळंब (उस्मानाबाद ) – 165
22 -पारगाव (बीड) 60
23- अंमळनेर (बीड) 55
24- पिंपळवंडी (बीड) 70
25 – हिंगणगाव (इंदापूर ) 110

२६ – मोळ (खटाव) – 52

महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त हा अनोखा रक्तदान शिबीर सप्ताह मास संकल्प राबविला व आम्ही या संकल्पनेत यशस्वी झाल्याचे शिवशंभू ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी यावेळी सांगितले, व या सप्ताह माससाठी गणपतराव आवटे फाउंडेशन, अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी बिग्रेड, अखिल शिवजयंती उत्सव कळंब, शिवयुग प्रतिष्ठान, महाराज प्रतिष्ठान, संजयभाऊ सोनवणे मित्र परिवार, अखिल करमाळा शहर शिवजयंती उत्सव तसेच अक्षय ब्लड बँक, पुणे-सातारा-सोलापूर, पुणे ब्लड बँक, हडपसर, सिद्धेश्वर ब्लड बँक, पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर, सोलापूर, मेडिकेअर ब्लड बँक, सोलापूर, बीड ब्लड बँक, बीड, जीवनदायी ब्लड बँक, बीड, या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्याचसोबत ट्रस्टच्या सर्वच नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करून हा संकल्प यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार देखील मानले व यापुढे हा रक्तदानाचा संकल्प चालूच राहील असे यावेळी ट्रस्ट कमिटीच्या वतीने नमूद करण्यात आले.

Exit mobile version