Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून प्लाझ्मा डोनरची चळवळ उभी: सरकारला करणार मदत!

Spread the love

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यात भारतीय जैन संघटनेला (बीजेएस) महाराष्ट्रातील गावागावात वेगवेगळे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यावेळी मिळालेल्या अनुभवावरून असे दिसते की कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपणही यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत प्लाज्मा डोनर्सला शोधून त्यांची प्लाज्मा देण्याची संमती घेण्याचे काम सुरु केले तर कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकते. यासाठी बीजेएसने संपूर्ण महाराष्ट्रात “बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजने” च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्याद्वारे प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या 5000 व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत सुपूर्द करण्याचा निर्णय बीजेएसने घेतला आहे.प्लाज्मा देण्यासाठी कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे, ज्यांचे वय १७ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना इतर कोणतेही गंभीर आजार नाही अशा व्यक्तीच प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. सर्व कोरोना मधून मुक्त होऊन बाहेर पडलेल्यांनी आपला प्लाज्मा दान करून एक पुण्याचे काम करावे. असे आवाहन भारतीय जैन संघटने तर्फे करण्यात आले आहे.

★संपर्कासाठी- भारतीय जैन संघटना पुणे

विभागीय अध्यक्ष- राजेंद्र सुराणा ( पुणे)-9371023161
जिल्हा अध्यक्ष सचिन बोगावत-( भिगवण ) 9665891111
विभागीय सदस्य- कमलेश गांधी- 9922822422
हर्षल भटेवरा (राहू )- 9422066088
मनोज पोखरणा ( केडगाव )- 9860722001
तसेच प्रत्येक गावातील भारतीय जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version