Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोना काळात रक्तदान आणि प्लाझ्मादानाच्या माध्यमातून मदत करणाऱ्या BJS पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन बोगावत यांना करोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित!

Spread the love

दौंड | आज केडगाव ता दौंड येथील बोरमलनाथ मंदिर येथे करोणा काळामध्ये रूग्णांना मदत,  प्लाजमा दान साठी केलेल कार्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केलेलं कार्य, लॉकडाउन कालावधीमध्ये गरजू लोकांना केलेला अन्नधान्याची किट्स वाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर फेशशिलड, कोवीड सेंटर साठी  वेगवेगळ्या पद्धतीची मदत, रूग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रेमडिसिविर  इंजेक्शन मिळवून देण्यासाठी मदत करणं, यासारख्या गोष्टींमध्ये केलेल्या कार्याबद्दल, अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका, मावळा संघटना महाराष्ट्र राज्य, व पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, या तीन संस्थांच्या वतीने भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांना करोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष विशाल कुंजीर सचिव मयूर सोळस्‍कर पोलीस फ्रेंड्स संघटनेचे अध्यक्ष सचिन गुंड संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे मावळा संघटनेचे स्वप्नील घोगरे, दादासाहेब माने राहुल दोरगे, यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातून आलेले ज्यांनी करोणा काळामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे, आसे संघटनेचे पदाधिकाऱ्यांना चा ही या वेळी सन्मान करण्यात आला, जैन संघटना पुणे जिल्हा सचिव मनोज पोखरणा आदी यावेळी उपस्थित होते, मयुर आंबा सोळस्कर, हर्षल जी भटेवरा, डॉ दिपक गांधी, जयेश ओसवाल, रमेश राठोड, प्रसाद मुनोत, सौरभ भंडारी, दोंण्ड यांचाही यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Exit mobile version