Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

भिगवण पोलिस स्टेशनला *ISO A ग्रेड* मानांकन; भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी मानले आभार!

Spread the love

इंदापूर | भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की भिगवण पोलीस ठाण्याकडून घेण्यात आलेले विविध लोकांच्या उपयोगी असणारे उपक्रम त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रशासकीय बाबी मध्ये केलेली सुधारणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोण या सर्वाचा परिपाक म्हणून आज भिगवण पोलिस स्टेशनला *ISO A ग्रेड* मानांकन प्राप्त झाले सदर मानांकनाचे प्रमाणपत्र *आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्वीकारला. सदर सन्मान भिगवण पोलिस ठाण्यातील आजी/माजी अधिकारी ,कर्मचारी त्याचप्रमाणे पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी आणि ज्यांच्यासाठी आम्ही कर्तव्य बजावत आहोत ते सर्व सामान्य नागरिक यांना मी समर्पित करतो.

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये भिगवण पोलिस ठाण्यामध्ये ज्या काही प्रशासकीय सुधारणा करता आल्या त्यामध्ये *मुद्देमालाचे वर्गीकरण व प्रमाणीकरण त्याचबरोबर परिसर स्वच्छता नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या आणि विनाविलंब प्रकरणांचा निपटारा या बाबींचा सोबतच सर्वसामान्य नागरिकांना कधीही पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांना भेटता यावे म्हणून शासकीय वेळेचे व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ पोलीस ठाण्यास हजर राहुन कोणत्याही मध्यस्थाशिवाय सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावता आले याचे समाधान आहे. अनेक नागरिकांचे शेती विषयक वाद त्यांच्यामध्ये समेट घडवून आणून मिटवता आले .

त्याचप्रमाणे किरकोळ संसारिक कारणामुळे ताटातूट झालेले व न्यायालयापर्यंत गेलेली संसार सुरळीत करून अनेक भगिनींना न्याय देता आला, वर्षानुवर्ष विनाकारण पोलीस ठाण्यास धूळ खात पडलेला नागरीकांचा ठेवा (मुद्देमाल) हा त्यांना पोलीस ठाणे स्तरावरच परत केला, महामार्गावर दरोडाटाकणार्‍या टोळ्या जेरबंद करून त्यांना मोका लावला व कायमचा बंदोबस्त केला, शाळा महाविद्यालय याठिकाणी रोडरोमिओंचा वावर राहणार नाही यासाठी आमच्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी खूप चांगले प्रयत्न केले, घरातून पळून गेलेल्या (बेपत्ता) व्यक्तींचा शोध घेण्यामध्ये भिगवन पोलीस ठाणे प्रथम* क्रमांकावर आहे आम्ही 98 % पेक्षा जास्त लोकांना शोधण्यात मागील दीड वर्षाच्या काळात यश मिळवले आहे,

कोरोणाच्या काळामध्ये कोणत्याही नागरिकांची जीवनावश्यक गोष्टी विना परवड होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली, पोलीस ठाणे स्तरावरून दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले हे विनामूल्य आणि कोणत्याही एफिडेविट शिवाय तात्काळ देण्याचे काम सुरू केले. त्याच्यासोबतच नागरीकांचे दृष्टीने महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल त्यामध्ये विहिरीवरील मोटर/ मोटर सायकल सोन्या-चांदीचे दागिने इत्यादी त्यांना *परत करता आला. पोलिसांची परंपरागत असणारी इंग्रजकालीन प्रतिमा बदलून ती लोकाभिमूख करण्यासाठी यापुढे अजून जोमाने काम करण्यासाठी सदर सन्मान आम्हाला प्रेरणा व ऊर्जा देईल याची मला खात्री आहे.

पोलीस ठाण्याचे कामकाजामध्ये मला व माझ्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना माननीय श्री. संदीप पाटील, (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), माननीय श्री.मिलिंद मोहिते (अपर पोलीस अधीक्षक बारामती) आणि माननीय श्री.नारायण शिरगावकर (उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग) या सर्वांचे वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण आणि सहायक पोलिस निरीक्षक श्री निळकंठ राठोड यांनी यापूर्वी रचलेला पाया पोलीस ठाण्याच्या शिरपेचामध्ये हा मानाचा तुरा रोवण्यामध्ये अत्यंत उपयोगी ठरला त्याबद्दल मी या सर्व अधिकाऱ्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो.

आपला लोकसेवक,

जीवन माने
सहायक पोलिस निरीक्षक
भिगवण पोलिस ठाणे

Exit mobile version