Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

भिगवण पोलिसांची जबरदस्त कामगिरी; पुणे-सोलापूर महामार्गावर ७६ लाखांचा गुटखा जप्त!

Spread the love

इंदापूर | पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण हद्दीत भादलवाडी येथे सोलापुरहुन पुण्याकडे प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणारा कंटेरनर भिगवण पोलिसांनी पकडुन त्या कंटेनर सह ७६ लाख २४ हजार सातशे 60 रुपयांचा गुटखा पान मसाला जप्त केला आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी केली आहे. याप्रकरणी वाहन चालक करमहुसेन हसनराजा चौधरी (वय.३३ रा. मुडीला, ता. मेहदावल, जि. संत कबीरनगर उत्तरप्रदेश) शहजाद तुफेल खान, शादाब तुफेल खान(रा. कोंढवा पुणे), अज्ञात मालपुरवठादार व गुटखा उत्पादन कंपनी यांचेविरुध्द भादवि अन्न सुरक्षा अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहन चालक करम हुसेन पिता हसन राजा चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरु करण्याची प्रशासनाची तयारी पण..याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहीती अशी – पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक इन्कलाब पठाण हे गस्त घालत असताना भादलवाडी येथील हॉटेल श्री व्हेज समोरुन एक कंटनेर (क्र. के.ए.२२ डी. २२७४) हा सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे निघाला होता. कंटेनरबाबत संशय आल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन कंटेनर थांबवुन तपासणी केली असता कंटेनरमध्ये ४५ लाख ५३ हजार सातशे साठ रुपयांचा हिरा पान मसाला,१० लाख ७१ हजार रुपयांचा रॉयल पान मसाला आढळुन आला. पोलिसांनी पान मसाला ५६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा गुठखा व २० लाख रुपयांच कंटेनर असा एकुण ७६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील, बारामती अप्पर पोलिस अधिक्षक प्रदीप मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस निरीक्षक रियाज शेख पोलिस नाईक इन्कलाब पठाण व भिगवण पोलिसांनी

केली.

Exit mobile version