Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

निमगाव केतकी व भिगवण कोविड केअर सेंटरचे कामअंतिम टप्प्यात; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे!

Spread the love

इंदापूर | सध्या इंदापुर तालुक्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत आहे, निमगाव केतकी व भिगवण या मोठया गावात वाढ होत असल्याने येथील कोविड केअर च्या कामाला गती दिली आहे. तसेच काल इंदापुर च्या कोविड सेंटरला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देवून सेंटर मध्ये दाखल रुग्णांना मानसिक आधार दिला. त्यांना पिण्याचे पाणी,जेवण, औषध वेळेवर मिळते का याची चौकशी केली तसेच येथील स्वच्छतेची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कोविड योद्धा म्हणून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस,आरोग्य व नगरपरिषद कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, पोलीस, प्रशासनातील सर्वअधिकारी,पत्रकार यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केलीतरकोविड वरून कोणीही राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

शदत्तात्रय भरणे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पोळ व पत्रकारांनी पीपीई किट घालून सर्व कोरोनाबाधीत रुग्णांशी सुसंवाद साधून त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छादिल्या. दत्तात्रय भरणे म्हणाले, तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच इंदापूर कोविड केअर सेंटर वर येणारा अतिरिक्तताण लक्षात घेवून भिगवण येथे ५० व निमगाव केतकी येथे ३० खाटांचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करणार आहे.

तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तालुक्यात १९५ रुग्ण कोरोना बाधित झाले असून पैकी १०७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर ७९ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. ९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यात येत आहे, माजी मंत्र्यांना कोरोनाचे गांभिर्य नाही, असाही टोला यावेळी भरने यांनी लगावला. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन दत्तात्रय भरणे इंदापुर तालुक्यातील जनतेला यांनी केले.

Exit mobile version