उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीमध्ये सर्वच नियम होणार कडक; काय राहणार चालू वाचा सविस्तर!
बारामती | शहरातील अऩेक भाग उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामतीतील प्रभाग 1 ते 19 हे सर्वच प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केले आहेत. या मुळे आता 7 तारखेपासून बारामतीतील सर्वच रस्त्यांवर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त नागरिकांना येता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच सोमवारपासून ते रविवार 20 सप्टेंबर पर्यंत हे आदेश लागू असणार असले तरी 13 सप्टेंबर रोजी एकत्र बसून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. उपविभागीय अधिका-यांनी आता आदेश निर्गमित केल्यामुळे बहुसंख्य बारामतीकरांना घराबाहेर पडता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. इन्सिडंट कमांडंट म्हणून हे आदेश निर्गमित झाल्याने बारामतीकरांवर हे आदेश बंधनकारक असतील. प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणा-यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या गोष्टींना सूट देण्यात आली आहे, ते वगळता इतर सर्व बाबी बंदच राहणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात हे सुरु असेल-:
• अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवठा करणारी वाहने
• निवास व्यवस्था असलेली बांधकामे व शासकीय निमशासकीय बांधकामे
• सर्व मेडीकल दुकाने, दवाखाने व हॉस्पिटल्स 24 तास सुरु राहतील
• दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण
• पशुचिकित्सा सेवा, रुग्णालयाशी निगडीत सेवा
• पेट्रोल पंप सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील.
• फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन मिळेल.
• एलपीजी गॅस सेवा व घरपोच गॅस
• आंतरजिल्हा व आंतरराज्य औद्योगिक वस्तु पुरवठा वाहतूक
• वर्तनमानपत्रे, डिजिटल, प्रिंट मिडीया कार्यालये व वितरण सकाळी 6 ते 9 दरम्यान
• पाणीपुरवठा करणारे टँकर
• सर्व बँका किमान मनुष्यबळासह सुरु राहतील.
• नगरपालिका कार्यक्षेत्रातील परवानाधारक उद्योगांना, औद्योगिक सहकारी वसाहत तसेच एमआयडीसी वखाजगी उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी व परतीसाठी दुचाकी व चारचाकी वाहन व निश्चित केलेल्या वाहनातून ओळखपत्रासह प्रवास करणे.
• माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येतील.
• विद्यार्थ्यांना कोणत्याही परिक्षेसाठी सूट देण्यात आली आहे, परिक्षेचे हॉल तिकीट जवळ ठेवणे अनिवार्य असेल.
• खालील लोकांना चारचाकी व दुचाकी वाहनांचा वापर स्वताःच्या ओळखपत्रासह करता येईल- न्यायाधिश, वकील, शासकीय कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, आशा वर्कर, वर्तमानपत्र, डिजीटल प्रिंट मिडीयाचे कर्मचारी, मेडीकल दुकानाचे कर्मचारी, दुध विक्रेते, गॅस, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, विद्युत विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी.