बारामती | बारामती शहर व तालुका येत्या 7 सप्टेंबर पासून पुढील चौदा दिवस पूर्णतः बंद राहणार आहे या दरम्यान शहराच्या सर्व सीमा बंद राहणार असून कोणालाही शहरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही फक्त वैद्यकीय सेवा आणि दूध वाहतूक सुरु राहणार आहे इतर सर्व प्रकारचे व्यवसाय व सर्व प्रकारच्यासेवा पूर्णतः बंद राहणार आहेत बारामतीतील हा दुसरा लॉक डाऊन कोरोनाचे रुग्ण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नाईलाजाने करावा लागला असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व गटनेते सचिन सातव यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. या लॉकडाऊन च्या काळामध्ये तालुक्याच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत. कोणीही येणार नाही आणि जाणार नाही. वैद्यकीय सेवा आणि दूध सुरु राहील. मागील तीन-चार दिवसात रुग्ण वाढले आहेत. संकट पुढे आणखीवाढू नये म्हणून हा चौदा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चौदा दिवसांचा कन्टेन्टमेंट झोन असून अन्य सेवा या काळात बंदराहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आत्ताच त्यांना लागणाऱ्या आवश्यक साधनांचा साठा करून घ्यावा. 14 दिवस काहीही मिळणार नाही. बारामतीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय असून बारामतीतील वाहतुक सेवाही बंद राहणार आहे. एसटीही बंद करणार आहे. जोपर्यंत शहर आणि तालुक्यातील जनता यात सहभाग घेणार नाही तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणे अशक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
बारामती तालुक्यात कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याने नागरीकांचं आरोग्य महत्वाचं आहे, नागरीकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण तिथेही जनता कफ्र्यु असणार आहे.