Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

बारामतीत अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली गॅसदाहिनी अखेर सुरू; पहिल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार!

Spread the love

बारामती  |  शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली गॅसदाहिनी अमरधाम स्मशानभूमीमध्ये आजपासून अखेर कार्यान्वित झाली. या दाहिनीत प्रथमच एका कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही गॅसदाहिनी सुरू करण्याबाबत “सकाळ’ने पाठपुरावा केला होता. पर्यावरणपूरक व कमी वेळेत अंत्यसंस्कार हे गॅसदाहिनीचे वैशिष्ट्य आहे. पहिल्या टप्प्यात फक्त कोरोनाग्रस्त मृतदेहांवरच या गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करणार असल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

कोरोनामुळे एकट्या बारामतीत आजपर्यंत 174 मृत्यू झाले असून, यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 78 इतका आहे. या सर्व मृतदेहांवर बारामती नगरपालिकेच्या कोरोना योद्‌ध्यांनीच अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारामुळे कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप, वाया जाणारा वेळ, साधनसामग्रीची जमवाजमव तसेच संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत मृतदेहाजवळ थांबून राहावे लागणे. या सारख्या प्रकारांनी कर्मचारीही वैफल्यग्रस्त झाले होते. हे सर्व आता थांबणार आहे. ही बाब विचारात घेत यादव यांनी गॅसदाहिनी कार्यान्वित करण्यास चालना दिली.

गॅसदाहिनीचे वैशिष्ट्ये;-

1. चार मिनिटात प्रज्वलित होते. 

2. अवघ्या तीन मिनिटात मृतदेहावर अंत्यसंस्कार. 

3. 24 सिलिंडर्सच्या मदतीने ही गॅसदाहिनी प्रज्वलित. 

4. एका अंत्यसंस्कारासाठी दोन सिलिंडर्सची गरज 

5. 24 सिलिंडर्समुळे 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार.

Exit mobile version