बारामती | कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर असताना कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्या मात्र लोकांना हप्ते भरण्यासाठी दबाव आणत असून महिलांचे बचत गट देखील बळजबरी करून वसुली करत असल्याचे चित्र बारामती शहरात दिसून येत आहे,मात्र असे असताना बारामतीतील प्रशासन या कर्ज वसुली करणाऱ्या लोकांवर का कारवाई करत नाहीत ? यामुळेच की काय यांची मजल वाढलेली दिसत असून यामुळे आता याकडे आता प्रांताधिकाऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आता सर्वसामान्य लोकांना वाटू लागले आहे.
बचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून विविध कामानिमित्त कर्ज घेतले होते, महिलांनी त्याचे हप्ते नियमित भरले आहेत,मात्र मागील तीन महिने लॉकडाउन असल्याने हफत्याची रक्कम महिलांना भरता येत आले नाही.मे महिन्यापासून अखेर मायक्रो फायनान्स कंपनी वसुली करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी त्यांचे कर्मचारी शहरात व गावागावात जात असल्याने हाताला काम नसल्याने पैसे भरायचे कुठून अशी चिंता देखील आता महिलांना सतावत आहे. बंधन बँक,भारत फायनान्स आय. डी.एफ.सी जैनांचे प्रतिनिधी फोन करून,घरी जावून लोकांना त्रास देत आहे. तसेच नागरीकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देखील देत आहेत.
हफ्ते भरले नाही तर तुमच्या घरी येऊन बसू ? आमच्या सरांनी आम्हाला पैसे घेतल्याशिवाय यायचे नाही ? असा प्रश्न देखील कर्ज वसूल करणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी करत आहेत, तरी देखील आता बारामतीच्या कार्यास्तरावर तसेच असणा-या सर्व फायनान्स व इतर बॅकांना प्रशासनाकडून नोटीसा देण्यात याव्यात, तसेच तीन महिने झाल्यानंतर दिवाळी झाल्यावर लोक हप्ता भरतील अशी मागणी करणारे निवेदन सी आर सामाजिक संघटनेकडून बारामतीचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.यावेळी सी आर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अस्लम शेख रणरागिणी बारामती शहर महिला अध्यक्ष रसिका सीआर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र सदस्य अमिन शेख तसेच या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय वाघमारे हे देखील उपस्थितीत उपस्थित होते.