मुंबई | उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचा सर्वच स्तरांवरून निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तरप्रदेशमधील महिलांवर अत्याचार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात अत्याचार काय, कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, माता-भगिनींवर अत्याचार करण्याचं तर सोडाच; पण कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये.
तसेच यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचीही आठवण सांगितली. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मला म्हणायचे, दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत, ही दहशत मोडून काढा. जर गुंडागर्दी चालू असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे, त्या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे.
उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय, कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.