Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

चिंता मिटली; ५० टक्के सवलतीमध्ये मिळतात औषधे!

Spread the love

महागडा उपचार खर्च अनेकांना परवडणारा नसतो. त्यात औषधांचा खर्च तर अधिक असतो. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन औषधी परियोजना सुरू केली आहे. या औषधी केंद्रावर गेल्यास तुम्हाला ब्रँडेड औषधांपेक्षा कमी किमतीत म्हणजे 50 टक्के कमी किमतीत औषधे खरेदी करता येणार आहे.

देशात केंद्र सरकारकडून गरीब आणि गरजवंतासाठी अनेक योजना राबवल्या जातात. वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊनच या योजना तयार केल्या जातात. आजारी पडल्यावर लोकांचा प्रचंड पैसा खर्च होतो. आजारापेक्षा औषधे भयंकर अशी म्हणण्याची वेळही येते. त्यावरही प्रचंड पैसा खर्च होतो. त्यामुळेच भारत सरकारने 2008मध्ये जन औषधी स्कीम सुरू केली आहे. या स्किममधून गरजू आणि गरीबांना मोठी मदत दिली जात असते. 2015मध्ये या योजनेचं नाव बदलून प्रधानमंत्री जन औषधी योजना असं केलं. तर 2016मध्ये त्याचं नाव प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना असं नाव बदलून ही योजना पुन्हा नव्याने सुरू केली. भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत रुग्णांना अत्यंत कमी किंमतीत जेनेरिक औषधे दिली जातात. खासगी मेडिकलमधील औषधांपेक्षा हे जेनेरिक औषधे किती स्वस्त असतात? आपल्या आसपासच्या जन औषधी केंद्रांची कशी माहिती मिळवायची? याचीच माहिती जाणून घेऊया.

Exit mobile version