पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आजी-माजी स्वयंसेवक निर्मित Sppu Nss Alumni या फेसबुक पेज वर स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे या व्याख्यानमाले दरम्यान रासेयो. स्वयंसेवक याच्यासाठी खास संवाद व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे.
सदर व्याख्यानमालेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहेत. प्रथम सत्रामध्ये मा. मनोदीप ठाकूर सर, द्वितीय सत्रामध्ये विनायक भास्कर राजगुरू, तृतीय सत्रामध्ये उमा शिवाजीराव खरे, व शेवटच्या सत्रात दर्पेश विजयसिंग डिंगर या सर्व स्वयंसेवकांनी राष्ट्रीय / राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. ही व्याख्यानमला सकाळी ११ ते ०१ आणि सायंकाळी ०६ ते ०८ या वेळेमध्ये संपन्न होणार आहे. या पेज निर्मिती ची मुख्य संकल्पना माजी स्वयंसेवक SPPU-NSS यांची आहे. तर आपण Sppu Nss Alumni या फेसबुक पेज ला लाईक करून Follow करा आणि येणारा स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय करा असे आव्हान रासेयो करत आहे.या व्याख्यानमालेत नक्कीच नवीन काही अनुभव मिळेल असे sppu माजी विद्यार्थी 6यांच्या कडून सांगण्यात आले आहे