वाढते कोरोना रुग्ण आणि ढासळती अर्थव्यवस्था यावरून लक्ष विचलित करण्यासाठी कंगना प्रकरण- खासदार डॉ अमोल कोल्हे
मुंबई | शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद विकोपला घेला आहे. मुंबई महापालिकेनं पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर कंगना अतिशय आक्रमक झाली आहे. आता तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करण्यास सुरुवात केला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी टिका केली केलं आहे.
कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना असल्याचं कोल्हे म्हणाले. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाती नोकऱ्या नाहीत. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगनाला जास्त महत्त्व दिलं जातं असल्याचं कोल्हे म्हणाले.
बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर यावेळी अमोल कोल्हें यांनी एक कलाकार म्हणूनही कंगनाच्या विधानांवर टिप्पणी केलं. ‘कलाकारांना सामाजिक भान असायला हवं. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायला हवी. मुंबई पोलिसांमुळे आज शहर सुरक्षित आहे. जेव्हा शहरात पाणी तुंबतं, तेव्हा आपले पोलीस बांधवच रस्त्यावर असतात. आता कोरोना काळातही तेच रस्त्यावर आहेत. अनेक पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जीव गमावला आहे. त्यावेळी कंगना काहीच बोलली नाही. त्यामुळेच तिला आणि तिच्या विधानांना किती महत्त्व द्यायचं, याचा विचार आपण करायला हवा,’ असं डॉ अमोल कोल्हे म्हणाले