Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट रक्तदान क्षेत्रात जपत आहे, महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी!

मुंबई  |  श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट कायम सामाजिक बांधिलकी जपत आला आहे आणि जपत राहणार यात काही शंका नाही आता पर्यंतच ट्रस्ट चे काम पाहता सर्वाना ट्रस्ट विषयी नक्कीच आपुलकी वाटते आणि या आपुली की मुळेच अनेक अनोळखी रक्तदाते मदतीला धावतात असतात असे अनेक रक्तदाते अनेक गरजूंचे जीव वाचवून आपली सामाजिक बांधिलकी जपून अध्या कर्तव्य त्यांनी ट्रस्ट वर विश्वास दाकवत केलं आहे याचाच प्रत्यय आज मुंबई मध्ये आला.

आज मुंबई मधील विहान हॉस्पिटल कामोटे येथे नितिन भोसले या रुग्ण ला रक्ताची खुप गरज होती .आपले शिवशंभु ब्लड ट्रस्ट चे नवी मुंबई प्रमुख *प्रा श्री हेमंत दादा धायगुडे* याना कॉल आला आणि सांगण्यात आलं की B positive रक्तगट असणाऱ्या तीन बॅग आवश्यक आहेत हेमंत दादांनी लगेच आपल्या रक्तवीरांना संपर्क केला कोरोना काळात कुठली हि भीती न बाळगता श्री ऋषिकेश ढोंगरे आणि श्री नितेश माने या रक्तवीरांनी तत्परतेने पुढे येहून रक्तदान केलं या अशा रक्तदाता मुळे तर श्री शिवशंभु ट्रस्ट च नाव महाराष्ट्र भर होत आहे असे  श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी म्हंटल.

महात्मा गांधी हॉस्पिटल नवी मुंबई येथून त्या गरजूना रक्ताच्या बॅग मोफत देण्यात आल्या हिच खरी श्री शिवशंभु ट्रस्ट ची ओळख काल पण आम्ही सर्वाना मदत करत होतो आणि आज हि करत राहणार यात काही शंका नाही

Exit mobile version