Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

लस घेतल्यानंतर किती दिवस तुम्ही सुरक्षित राहणार?

Spread the love

मुंबई | गेल्या दीड वर्षांपासून आपला देश कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी दोन हात करत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा क्रूरपणा आपण सर्वांनीच पाहिला. अनेक जणांचे आप्त-स्वकीय, मित्र, नातेवाईक, जवळची माणसं त्यांना सोडून गेले. एक वेळ तर अशी आली की आपल्या देशात दररोज कोरोनाच्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्या पुढे गेली आणि दररोज 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. हे पाहता भारतासह जगातील सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

देशात लसीकरणाला वेग

आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 50,68,10,492 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली आहे. शनिवारी (6 ऑगस्ट) 55,91,657 लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला आहे. कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट पाहता केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारे जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्यावर भर देत आहेत.

सध्या भारतात कोरोनाच्या तीन लस दिल्या जात आहेत. यामध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड या दोन भारतीय लसींचा समावेश आहे. याशिवाय, रशियन लस स्पुतनिक व्ही देखील लस दिली जातीय. भारताने सरकारने अलीकडेच सिंगल-डोसची जॉन्सन अँड जॉन्सन लसीला मंजूरी दिली आहे.

लसीचा परिणाम किती काळ राहणार?, एम्सच्या डॉक्टरांचं महत्त्वपूर्ण उत्तर

कोरोनाची लस आपल्या शरीरात गेल्यानंतर, अँटीबॉडीज तयार होतात… ज्या कोरोनाशी लढण्यास सक्षम असतात. लस आपल्याला गंभीर आजार आणि मृत्यूसारख्या घटनांपासून सुरक्षित ठेवते.

परंतु लोकांच्या मनात हा एक मोठा प्रश्न आहे की, आपल्या शरीरात लसीद्वारे तयार केलेल्या अॅन्टीबॉडी किती काळ प्रभावी राहतात, म्हणजे किती काळ त्याची परिणामकारता असते? राजधानी नवी दिल्ली येथे असलेल्या एम्स रुग्णालयात (AIIMS) कार्यरत असलेले डॉक्टर संदीप मिश्रा यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.

मिश्रा म्हणाले, “लसीचा पूर्ण असर जवळपास 9 महिने टिकतो. यामध्ये, अँटीबॉडीज 6 महिन्यांसाठी पूर्णपणे प्रभावी असतात, त्यानंतर लसीचा प्रभाव थोडासा असू शकतो. सध्या लसीचे दोन डोस सर्व लोकांना दिले जात आहेत आणि कदाचित एक वर्षानंतर बूस्टर डोस देखील दिला जाऊ शकतो. या विषयावर अनेक ठिकाणी संशोधन चालू आहे.”

Exit mobile version