बारामती | आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राला लाभलेले संवेदनशील आणि यशस्वी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सदस्य नोंदणी चालू असलेल्या शिवसेनेच्या बारामती मधील अभियान कक्षाला महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी अदिती तटकरे यांचे स्वागत शिवसेना पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, ज्येष्ठ स्वयंसेवक सदानंद शिरदाळे, वैशाली आखीवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची पुणे जिल्हा कक्ष प्रमुख भूषण सुर्वे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या भाग्यश्री धायगुडे, अक्षय गायकवाड, पुष्कराज निंबाळकर यांनी केले यावेळी आदिती ताई तटकरे यांनी अभियान कक्षाला भेट देऊन महिलांचे प्रश्न व सदस्य नोंदणी कशाप्रकारे चालू आहे याची माहिती घेतली, व आतापर्यंत 10 हजार पेक्षा जास्त नोंदणी झाल्यामुळे आदिती ताईंनी शिवसेना पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे कौतुक केले.