Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावे; छत्रपती संभाजीराजे!

Spread the love

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी पायी सर केला. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे  यांनी ही आपल्यासारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी मोठी समाधान देणारी बाब असल्याचं म्हटलं. तसंच दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावे अशी विनंती त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. तसंच राज्यपालांनी प्रत्येक मंत्र्याला एकेक किल्ला दत्तक घेण्याच्या आवाहनाचं स्वागत आवाहन केलं.

“राज्यपालांना माझी एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या ध्येयवादाने रायगडावर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल. स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल,” असं ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

Exit mobile version