Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

85 वर्षीय आजीने केले सर्वांना चकित; खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल!

पुणे | पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या शांताबाई पवार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी शांताबाईंना आर्थिक मदत दिली आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शांताबाई पवार यांची भेट घेत त्यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केलीये. देशात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशीचं परिस्थिती शांताबाई पवार यांच्यावर ओढावलीये. शांताबाई पोटापाण्यासाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या काही मुलांसाठी पुण्यात बाहेर पडून मार्शल आर्ट्सचे खेळ करतात. त्यातून त्या आपला खर्च भागवतात.

85 वर्षीय शांताबाई यांचा व्हिडिओ पाहून त्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या व्हिडिओची अभिनेता रितेश देशमुख आणि पुण्याच्या आयुक्तांनी देखील दखल घेतली. रितेश देशमुखने या आजीचा व्हिडिओ शेअर करत त्यांचा पत्ता मागवला होता. तसेच त्याने या आजीला आर्थिक मदत केली आहे.

Exit mobile version