प्रिय साथी,
मी राहुल भोसले, सह्याद्री प्रतिष्ठान द्वारे आपल्या सर्वांचे २६ जानेवारी रक्तदान शिबिर या whatsapp ग्रुप मध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. सह्याद्री प्रतिष्ठान आणि इतर स्थानिक सामाजिक गटांनी सोबत येवून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. कोरोना कालावधीत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे. रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही आहे. अशा सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सामाजिक जबाबदारी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठाण, अखिल खडकी मातंग समाजसेवा संस्था आणि श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट, पुणे या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी खडकी मध्ये रक्तादान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहात असा मला विश्वास आहे. परंतु आपल्याला इथपर्यंत मर्यादित राहून चालणार नाही. तर समाजाची गरज मोठी आहे. त्यामुळे आपले प्रयत्न म्हणजेच रक्तदात्यांची संख्या सुद्धा मोठी असणे आवश्यक आहे. तरी आपण सर्वांस आवाहन आहे कि आपण जास्तीत जास्त लोकांना या रक्तदानाच्या प्रक्रियेत सहभागी करूयात.
कोणत्याही प्रकरचा संवाद साधायचा असल्यास आम्हाला (राहुल भोसले-9552523722 आणि शेखर पवार-9767391574) संपर्क करू शकता.