एका रुग्णवाहिकेतून १२ कोरोना मृतदेह; अहमदनगर मध्ये कोरोनाच्या काळात गलिच्छ राजकारण!
एका रुग्णवाहिकेतून एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाहून नेण्याचा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार तसेच हा प्रकार म्हणजे सरकारला बदनामी करण्याचा जाणून-बुजून प्रयत्न केला गेला आहे. यासाठी सरकारकडे पैसा अपूर्ण नाही, मी सुद्धा माझ्या मतदार संघात आमदार फंडातून रुग्णवाहिका घेतली असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सदर प्रकरणावर बोलून दाखविले. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहाशी कोणत्याही प्रकारची हेळसांड न करता सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे असे सक्त निर्देश राज्य सरकारने सर्व महानगर पालिकेला आधीच दिले होते. मात्र कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १२ मृतदेह अंत्यविधीसाठी नेताना रुग्णवाहिकेत अस्ताव्यस्त टाकून दिल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी समोर आला होता.
शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना तसे निवेदन देऊन घडलेल्या प्रकारची माहिती दिली होती. आज नगरमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती दिली तसेच या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त सदर घडलेला प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असे सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविले.