Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

भिगवणकारांच्या चिंतेत वाढ; कोरोनाचा प्रभाव वाढतोय !

Spread the love

भिगवण | इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी दिली आहे. या मधील एक महिला ही भिगवण येथील एका कापड दुकानामध्ये काम करत होती. त्यामुळे भिगवण शहराला कोरोनाचा धोका वाढला आहे.

भिगवण स्टेशन परिसरामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पूर्वी एप्रिलमध्ये एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी (ता. १०) कोरोनाबाधीत झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या संपर्कातील १४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी बारामती व इंदापूर येथे चाचणी करण्यात आलेल्या व्यक्तींचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन व्यक्तीना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तर इतर व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रुग्णाच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्यामुळे भिगवण स्टेशनसह भिगवण परिसरास कोरोनाचा धोका वाढला आहे. तीन कोरोनाग्रस्ता मधील एक महिला ही भिगवण येथील एका कापड दुकानामध्ये कामावर होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कातील १६ व्यक्तींना होम कोरंटाइन करण्यात आले आहे. संपर्कातील व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

भिगवण स्टेशनचा परिसर सील करण्यात आला आहे.तसेच आरोग्य विभागाच्या वतीने येथील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे,

Exit mobile version