Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

प्रामाणिकपणे अभ्यास करून आमचा विद्यार्थी पास झाला; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक!

Spread the love

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दै. सामानासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. काल मुलाखतीचा 1 ला भाग प्रकाशित झाला होता. आजच्या दुसऱ्या भागात त्यांनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर आपली सडेतोड मतं व्यक्त केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या सहा महिन्यांच्या कामाविषयी देखील त्यांनी भाष्य केलं आहे. या 6 महिन्यांच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी पूर्णपणे पास झाला आहे. बाकीच्यांसारखे आमचा अभ्यास चालू आहे असे न म्हणता, आमचा विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करतोय.

पुढच्या परीक्षांची आता चिंता वाटत नाही. पुढच्या परीक्षेतही तो पास होईल असा विश्वास वाटतो, अशी स्तुतीसुमनं शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली. संजय राऊत यांनी ठाकरे सरकारचं सहा महिन्यांचं प्रगतीपुस्तक आपल्याकडे आलंय का? असा प्रश्न पवारांना विचारला. त्यावर पवार म्हणाले, “आता कोठेतरी लेखी परीक्षा झाली आहे. पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रक्टिकलमध्ये सु्द्धा हे सरकार यशस्वी होईल असे सध्याचे चित्र दिसत आहे. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती नाही.

राज्याच्या विचार करून तुम्ही जर विचारत असाल तर आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे.” संजय राऊतांनी पुन्हा पवारांना टोचलं असता, “अर्थात मी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतोय. कारण शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम काम करत असते. त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार”, असंही पवार म्हणाले.

Exit mobile version