मुंबई | कोरोनाच्या महामारी संकटांना तोंड देत असतानाच महाराष्ट्राचे लाडके गणपती बाप्पा यांचे काही दिवसात आगमन होणार असून या वर्षीचा गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा त्यासाठी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन शांसनाने काही सूचना जरी केल्या आहेत.
सार्वजनिक मंडळांची गर्दी कमी करण्यासाठी सरकारे किती उंचीची मूर्ती स्थापन करता येणार यासाठी काही अटी घातल्या आहेत.
सार्वजनिक मंडळाची गणेशाची मूर्ती ही जास्तीत जास्त 4 फुटांपर्यंत असावी, त्यापेक्षा मोठी चालणार नाही, तसेच घरगुती गणेशाची मूर्ती ही 2 फुटांपेक्षा मोठी नसावी आज त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक मंडळांना स्थानिक प्रशासन/नगरपालिका/महापालिका यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे, तरी राज्यातील सर्व मंडळांनी
सूचनांचे पालन करावे असेही आव्हान यावेळी शासनाकडून करण्यात आले.