Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाला रोखण्यासाठी अजितदादांनी घेतला मोठा निर्णय; पुणे 15 दिवस लॉकडाऊन होणार!

पुणे | कोरोनाच्या संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन,कोरोनाची साखळी तोडण्याकरीता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसंच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितले की येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलै रोजी मध्यरात्री पासून पुढचे १५ दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली प्रशासनाकडून लवकरच जारी केली जाणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येईल. यापूर्वी नागरिकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला होता.

‘कोरोनाचा संसर्गाचा आकडा वाढत आहे. तरीही काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता बिनधास्तपणे फिरत आहेत. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.
तसेच पुणे ग्रामीण भागात व शहरात पोलिस प्रशासनास बंदोबस्ताबाबत सुचना देण्यात आल्या. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्वच स्तरातील प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित असल्याचे अधिकृत सुत्राकडून सांगण्यात आले

Exit mobile version