मुंबई/भूषण सुर्वे | आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री दालनात सारथी संस्थेची बैठक छत्रपती संभाजीराजे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिक, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, विनोद पाटील, धनंजय जाधव तसेच आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्तितीमध्ये पार पडली. सकाळी बैठकीमध्ये गोंधळ झाला अश्या बातम्या आल्या आम्ही सोशल डिस्टन्स ठेऊन ही बैठक पार पाडत असल्याने काहीजण नाराज झाले परंतु आम्हाला बैठक महत्वाची होते असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेला सर्वच गोष्टींना मान्यता देण्यात आली, बऱ्याच निर्णयांना हिरवा कंदील देखील दाखवण्यात आला. जरी कोरोनाचे संकट असले तरी सारथी संस्थेला उद्याच 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच दर 2 महिन्यांनी आम्ही जे काही निर्णय आहेत संस्थेबद्दल ते घेतले जातील.
तसेच मला अजित पवार यांनी स्वतःहा मोठे निर्णय घ्यायचे आहेत त्यामुळे आज मी स्वतःहा हे सर्व करणार आहे असे विधान छत्रपती संभाजीराजेंनी केले. तसेच शाहू महाराजांच्या जीवनाचे सार्थक व्हावे यासाठी सारथी ही संस्था कायम लोकांना आणि मराठा समाजाला मदत करणारी संस्था आहे ही अशीच कायम राहावी आणि मराठा समाजाचा आपण कधीच विश्वास घात करणार नाहीत असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.