पुणे | पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी संबंधित नियम न पाळणे, मास्क न लावणे, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. 3 ते 7 जुलैदरम्यान 262 वाहने जप्त केली असून 2 हजार 432 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना संदर्भात नियम मोडल्याप्रकणी चार दिवसांत दोन हजार 432 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणेकर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी सांगितले.
★याप्रमाणे असेल कारवाई आणि कलम, आपणही बघून घ्या:
मास्क न घालणे – 778
सोशल डिस्टन्स न पाळणे – 3
तीनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक – 107
वेळेचे बंधन न पळता दुकाने उघडी ठेवणे – 45
विनाकारण रस्त्यावर पायी फिरणे – 901
विनाकारण गाडीवर फिरणे – 336
जप्त केलेली वाहने – 262